आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकावे ते नवलंच!:ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवला सोन्याचा वस्तरा, 8 तोळे सोन्याने बनलेल्या या रेजरची किंमत 4 लाख रुपये

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी या सलूनचे पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कोरोनामुळे सर्वच व्यवसाय हे मंदावले आहेत. दरम्यान केस कापण्याचा व्यवसायही कमी झाला आहे. यामुळे आता ग्राहकांना सलूनपर्यंत आणण्यासाठी वेगवेगळे मार्केटिंग फंडे वापरले जात आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये सलून मालकाने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या सलूनमध्ये शेविंगसाठी सोन्याच्या वस्तरा तयार केला आहे.

ग्राहकांसाठी सोन्याचा वस्तरा बनवणाऱ्या अविनाश बोरुंदियाने सांगितले की, कोरोनाने आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. परवानगी मिळूनही जास्त लोक येत नव्हते. ज्यानंतर मी लोकांना सलूनपर्यंत आणण्यासाठी ही युक्ती पध्दत वापरली. शुक्रवारी या सलूनचे पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बोरुंदिया यांनी सांगितले की, सलूनमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता ग्राहक नक्कीच वाढतील.

8 तोळे सोन्याचा आहे वस्तरा
बोरुंदिया यांनी सांगितले की, हे रेजर बनवण्यासाठी 8 तोळे सोन्याचा वापर झाला आहे. यावर एकूण 4 लाख रुपये खर्च आला. या रेजरच्या माध्यमातून आम्ही सामान्या लोकांना विशेष आनंद देण्याचा प्रयत्न करु. ज्यांच्याजवळ पैसे नसतील ते देखील या रेजरने शेविंग करु शकतील. ग्राहकांना सोन्याच्या रेजरने शेव करण्यासाठी केवळ 100 रुपये खर्च करावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...