आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आज व्यापाऱ्यांचा बंद:जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेध

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावर जैन धर्मीयांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज बुधवारी (दि 21) पुण्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसर आज सकाळीपासून 3 वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. या बंद संदर्भात शहरातील जैन संघटनांनी सकाळी नऊ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली.

तीर्थक्षेत्रे ही आपल्या संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीची केंद्रे आहेत, असे जैनांचे म्हणणे आहे. त्यांचे पावित्र्य आपण लक्षात ठेवले पाहिजे. समेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाज दुकाने बंद ठेवून आंदोलन करणार आहे. या मुद्द्यावरून बुधवारी देशातील विविध शहरांमध्ये व्यावसायिक बंद पुकारण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयाचा निषेध करत देशभरातील अनेक शहरांमध्ये जैन संघटनांनी व्यवसाय आणि संस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुण्यतील जैन व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला असून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी पार्कंगच्या वादातून तरुणास मारहाण

पुण्यातील महंमदवाडी परिसरात कल्ब 24 समाेरील माेकळया मैदानात संग्राम सिताराम डुबल (वय-20,रा.हडपसर,पुणे) हा त्याचे मित्रांसाेबत 19 डिसेंबर राेजी रात्री कार पार्क करुन त्यांचे साेबत गप्पा मारत थांबला हाेता. त्यावेळी राेपी मयुर भानगिरे (रा.महंमदवाडी,पुणे) हा त्याच्या 10 ते 12 साथीदारांसह तेथे येवून त्याने गाडी पार्क करण्याचे कारणावरुन वाद घालून त्यांच्यात वाद हाेवून डुबल यास वाईट शिवीगाळ करुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पोलिसात तक्रार दिली तर तुझा गेम करेल अशी धमकी देऊन बांबुने व विटांनी मारहाण करुन जखमी केले आहे. याप्रकरणी आराेपींवर काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...