आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात केमिकल कंपनीत स्फोट:आगीत 15 महिलांसह 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड, दोन कामगार गंभीर जखमी

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला लागलेली भीषण आग.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नाॅलाॅजी या वाॅटर प्युरिफायर व सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीत साेमवारी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण अाग लागली. यात १८ जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. मृतांत १५ महिलांसह ३ पुरुषांचा समावेश आहे. अागीत त्यांचा मृतदेह जळून खाक झाले. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून ५ लाख, तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या केमिकल कंपनीत एकूण ४१ कर्मचारी साेमवारी कामासाठी अाले. अाग लागली तेव्हा एकूण ३७ कामगार कंपनीत हाेते. साेमवारी दुपारी अडीच वाजता केमिकलचे दाेन स्फाेट झाले अाणि अल्पावधीत भीषण अाग पसरली. अाग अाणि धुराचे अाकाशात झेपावणारे लाेट उपस्थितांना धडकी बसवणारे हाेते.

दाेन जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात अाले. सुरुवातीला अग्निशमनचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अागीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा फवारा केला. परंतु त्यामुळे अागीचा भडका अाणखी पसरला. अागीचे राैद्ररूप व बंब कंपनीत जाण्यास अडथळा येत असल्याने स्थानिक दाेन जेसीबी अाणून त्याच्या साहाय्याने कंपाउंड व कंपनीच्या इमारतीचा काही भाग पाडण्यात अाला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी कंपनीत शिरून अाग विझविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अग्निशामक दलाच्या आणखी ९ गाड्या दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी एकूण १८ मृतदेह कंपनीतून बाहेर काढले. परंतु मृतदेह जळून खाक झालेले हाेते अाणि त्यांची अाेळख पटवणेही अवघड बनले हाेते.

आगीचा भडका उडताच... आगीचा भडका उडताच कंपनीतील कामगारांची धावपळ उडाली. जीव वाचवण्याकरिता प्रत्येक जण कंपनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत हाेता. परंतु अागीची भीषणता वाढल्याने महिला कामगारांना बाहेर पडणे अवघड झाले अाणि अागीच्या तांडवात त्या अडकल्या गेल्या.

बातम्या आणखी आहेत...