आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याने छळले होते...:पुण्यात कचरा वेचणाऱ्या 3 जणांवर हॉटेल कर्मचाऱ्याने टाकले उकळते पाणी, उपचारादरम्यान मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तीन जणांवर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने उकळते पाणी फेकले. यामध्ये गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून हॉटेल सील करण्याची तयारीही सुरू आहे.

ही हृदयद्रावक घटना गेल्या आठवड्यात घडली होती, मात्र मंगळवारी यातील एका महिलेच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पुण्यातील सासवड परिसरात 25 मे रोजी ही घटना घडली होती. हॉटेलचालक नीलेश ऊर्फ ​​पप्पू जगताप याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. स्थानिक आमदाराच्या दबावाखाली पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला जात आहे. हॉटेलचालक सध्या फरार आहे.

घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पायऱ्यांवर त्रस्त होताना दिसत आहे.
घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पायऱ्यांवर त्रस्त होताना दिसत आहे.

घटनेनंतर महिलेचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओही आला समोर

या घटनेची माहिती देताना एका वृद्ध महिलेचा कचरा उचलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ घटनेनंतरचा आहे. शेवंताबाई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. ती घडलेली हकिगत सांगताना दिसत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्हिडिओच्या आधारे सासवड पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली.

या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे दिसत आहे.

ही घटना सासवड पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घडली.
ही घटना सासवड पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घडली.

सासवड पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घडली घटना

सासवड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. त्यामुळेच पोलिस हे प्रकरण लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस निरीक्षक चिकले यांनी सांगितले की, पप्पू जगताप यांच्या हॉटेलजवळील अहिल्यादेवी मार्केटमध्ये तीन कचरा वेचक बसायचे. याचा राग येऊन पप्पू जगताप नावाच्या व्यक्तीने आधी तिघांना काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांच्या एका कर्मचाऱ्याला उकळते पाणी फेकण्यास सांगितले. गंभीर भाजल्यानंतर आरोपी तिघांना मरणासाठी सोडून तेथून निघून गेला.

बातम्या आणखी आहेत...