आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफोन घेण्याच्या नादात तरुणीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सासवड येथे घर पाहण्यासाठी ही तरुणी गेली होती, त्यावेळी ही घटना घडली.
अनुष्का जगताप( वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. 2 एप्रील रोजी ही घटना घडली आहे. फोन घेण्यासाठी गेली असताना इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तरुणी पडली. उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जबर मार लागल्याने तिचा बुधवारी मृत्यू झाला.
नक्की काय घडले?
पुण्यातील सासवड परिसरात सुनील जगताप या बांधकाम व्यावसायिकाची ही मुलगी आहे.2 एप्रील रोजी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधकामाची पाहणी करण्यासाठी ती गेली होती. फोन आला म्हणून गडबडीत खाली येत असताना पाचव्या मलल्यावरून ती खाली पडली. मात्र, गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अनुष्काच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती. अनुष्काच्या निधनाने तिच्या मित्र परिवारात दुःख पसरले असून सर्वांना धक्का बसला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.