आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 'ती' असुरक्षितच:22 वर्षीय तरुणीचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करत खून; आरोपी फरार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणाच्या वादातून पुण्यातील औंध परिसरात एका तरुणीचा बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर वार करुन तिला गंभीर जखमी करत तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वेता रानवडे (वय-22,रा.औंध,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता रानवडे ही तरुणी औंध परिसरात सिध्दार्थनगर भागात राहण्यास आहे. प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन तिचे एका तरुणाशी बुधवारी दुपारी वाद झाले. त्यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या जवळील धारदार शस्त्र काढून थेट तरुणीवर जीवघेणा हल्ला करत वार केले. संबंधित तरुणीवर त्याने वार केल्यानंतर ताे पसार झाला. मात्र, या घटनेत रक्ताच्या थाराेळयात पडलेल्या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घाेषित केले. पसार झालेल्या हल्लाखाेर आराेपी तरुणाचा पोलिस शाेध घेत आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...