आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:माझ्या जवळ का येतोस, पत्नीने पतीच्या कानशिलात लगावली; पतीने घेतला जीव!

शिक्रापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथे घडली आहे. आशा पवार असे हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीची किरकोळ वादातून हत्या केली आहे. माझ्या जवळ का येतोस, असे पत्नी पतीला म्हणाली. त्यानंतर पत्नीने पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा चाकूने हल्ला करत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पतीने थेट शिक्रापूर पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी भाऊ पवार याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी पतीने किरकोळ वादातून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. माझ्या जवळ का येतोस, असे पत्नी पतीला म्हणाली, त्यानंतर पत्नीने पतीच्या कानशिलात लगावली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. पत्नीची चाकूने निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: पोलिस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले आहे. रामदास उर्फ भाऊ पवार असे आरोपी पतीचे नाव आहे. पुढील अधिकचा तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...