आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात वेदनादायी घटना:वडिलांनी आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडीमारुन केली आत्महत्या, ओळख पटावी म्हणून बाहेर मोबाईल आणि पैसे ठेवले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलींच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता

पुण्याच्या ग्रामीण शिरूर भागात वडिलांनी आपल्या दोन मुलींसोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील तळेगाव ढमढेरे गावात गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. एका शेतकऱ्याला विहिरीबाहेर तिघांच्या चप्पल, मोबाईल आणि पैसे दिसले यानंतर या घटनेची माहिती मिळाली. या शेतकऱ्याने विहिरीत पाहिले तर तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगत होते. रात्री उशिरा तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शेतकर्‍याने प्रथम याची माहिती ग्रामपंचायतीला व त्यानंतर पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोहोचलेले पोलिस आणि बचाव पथकाने कठोर परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह विहिरीतून काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांना राजेंद्र भुजबळ (42) आणि त्यांच्या दोन मुली ऋतुजा(10) आणि दीक्षा भुजबळ(8) चे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरात दुःखाचे वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वीच गावात आले होते हे कुटुंब
पुण्याच्या शुक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला आहे. तपास अधिकारी आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश माळींनी सांगितले की, राजेंद्र भुजबळ काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलींना घेऊन गावात आले होते. काही लोकांना विचारपूस केल्यानंतर कळाले की, त्यांची आर्थिक स्थिती बरी नव्हती. पण पोलिस चकीत आहेत की, गावात स्वतःचे घर आणि शेती असूनही त्यांनी असे पाऊल का उचचले. तपासात समोर आले आहे की, मुलींच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...