आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदवार्ता !:पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू होणार; ज्योतिरादित्य सिंधिया यांची घोषणा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याची हवाई वाहतूक क्षेत्रात आम्ही विकास करणार आहोत. यासाठी पहिली मागणी उड्डाणासाठी स्लॉट्ससाठीची आहे. त्यामुळे पुण्याला 14 अतिरिक्त स्लॅट्स देणार आहोत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढवण्याची आहे. त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी (02 सप्टेंबर) पुण्यात बोलत होते.

आयसीसी ट्रेड टॉवर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील , खासदार गिरीश बापट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सुधीर मेहता, प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.

पुणे - सिंगापूर विमानसेवा सुरू करणार

कार्यक्रमा नंतर पत्रकारांशी बोलताना सिंधिया म्हणाले, पुणे सिंगापूर विमानसेवेचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्यानुसार पुणे ते सिंगापूर विमानसेवा लवकरच सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर बँकॉक आणि दोहा या ठिकाणी विमानसेवा सुरु करण्याबाबत देखील आम्ही विचार करतो आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यातुन कार्गो हब होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोहगाव विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि त्यामार्फत आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक वाढवणार आहे. प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कोणती जागा निवडावी हे माझ्या मंत्रालयाचे काम नाही. हे काम आणि त्याचे सर्वेक्षण हे राज्य सरकारने करायचे आहे. राज्य सरकारने जी जागा निवडायची आहे ती निवडावी आणि आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा.

काय म्हणाले सिंधिया ?

सिंधिया म्हणाले, पुणे शहरात उद्योग तसेच बाजारपेठेसाठी पोषक वातावरण असल्याने उद्योगवाढीसाठी तसेच उद्योग संबंधी प्रश्नांच्या सोडवणूकीसोबतच पुण्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य असणार आहे. बालपणीपासून आपले पुणे महानगराशी वेगळे नाते असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पाटील म्हणाले, पुणे महानगरात कोरोना कालावधीत ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी करून ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासोबतच व्हेंटीलेटर तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करून उद्योजकांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. उद्योग व्यवसायाबाबत असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील आहे. विशेषत: गतीमान वाहतूकीच्या सुविधांवर भर देण्यात आला आहे.चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गतीने सोडविण्यासोबतच रिंगरोड, विमानतळ तसेच उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राज्य शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत असून या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल.या संपूर्ण प्रक्रियेतील खर्चासाठी राज्य सरकार योगदान देईल आणि या प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

सिंधिया यांनी चालवली इलेक्ट्रिक व्हेईकल

पुण्याजवळील लव्हळे याठिकाणी असलेल्या सिंबायोसिस शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसोबत ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या चर्चासत्राचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. चर्चासत्र संपल्यानंतर सिंधीया यांना संस्थेतील प्रदर्शन पाहण्यासाठी जायचे होते. दोन इमारतींच्यामधे गोल्फ कोर्स असल्याने ज्योतिरादित्य सिंधीया यांनी गोल्फ कोर्सवरील इलेक्ट्रिक व्हेईकल स्वत चालवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शा. ब. मुजुमदार आणि सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या संचालिका विद्या येरवडेकर हे गोल्फ कोर्सवरील कारमधले यावेळी पॅसेंजर होते.

ज्योतिरादित्य सिंधिया घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दुपारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मराठा साम्राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांचा हा महत्वपूर्ण उत्सव आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे भव्य आणि सुंदर स्थान आहे. पंतप्रधानांच्या विचारधारेने भारत विश्वगुरू ही कल्पना पुढे घेऊन आम्ही जाऊ.

बातम्या आणखी आहेत...