आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगिरी:पुणे स्मार्ट सिटीचे मानांकन उंचावले; स्मार्ट पुणे राज्यात प्रथम, देशात 15 वे

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे पुणे स्मार्ट सिटीचे योगदान

कोरोनाच्या परिस्थितीतही पुणे स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण क्षमतेने सुरू असून स्मार्ट सिटी मिशनमध्ये पुणे शहर महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे, तर देशात १५ वे स्थान प्राप्त केले आहे. तसेच यामुळे एकूण क्रमवारीत महाराष्ट्र राज्यालाही वरचे स्थान प्राप्त झाले आहे.

प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची अद्ययावत माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये ऑनलाइन अपडेट करण्यात आली आहे. यामुळे कामगिरीच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीचे क्रमवारीतील स्थान तथा मानांकन उंचावले आहे. पुण्याने राष्ट्रीय क्रमवारीत २८ वरून थेट १५व्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉकडाऊनपूर्वी पुणे सतराव्या क्रमांकावर होते. आता १५वे स्थान प्राप्त केले आहे.

लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामेदेखील निरंतर सुरू आहेत. त्याशिवाय कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीने एचआयएमएस प्रकल्पांतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी योगदान देत आहे. यामुळे स्मार्ट सिटीची कामगिरी निश्चितच उंचावली आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

सुधारित मानांकनाबद्दल समाधान व्यक्त करून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “नियोजित प्रकल्प राबवण्याबरोबरच पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाऊनच्या कालावधीतही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला आहे. तसेच प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील पुणे शहराचे स्थान आणखी उंचावेल असा विश्वास आहे.

राष्ट्रीय स्तरावर दखल...
कोरोना महामारीच्या काळातील पुणे स्मार्ट सिटीच्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून त्याचे कौतुकही झाले आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पांतर्गत केलेल्या उपाययोजनांबद्दल डिजिटल टेक्नॉलॉजी सभा उत्कृष्टता पुरस्कार २०२० मध्ये पुणे शहरास स्थान प्राप्त झाले आहे. पुणे स्मार्ट सिटीने रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली अंतर्गत ‘पुणे टेलिमेडिसिन- आरोग्य धीर’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी मोफत समुपदेशन हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मानसिक ताण वा नैराश्य आलेल्या व्यक्ती या क्रमांकावर संपर्क साधून मोफत सल्ला घेऊ शकतात.

महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन
{ पुणे- १५ { नाशिक- १६ { नागपूर- ४२ { सोलापूर- ४४ { ठाणे- ५५ { पिंपरी चिंचवड- ६१ { कल्याण डोंबिवली- ६२ { औरंगाबाद- ६७