आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई ते सोलापूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी धावणार आहे. या एक्सप्रेसवेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकावर ही एक्सप्रेस आल्यानंतर प्रवाशांनी ट्रेन पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पुणे रेल्वे स्थानकातून पुणे-सिकंदराबाद आणि सोलापूर ते मुंबई या दोन मार्गांवर ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून दोन्ही रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सुखद प्रवास लवकरच
उद्घाटनाच्या दिवशी सोलापूर स्थानकावरून दुपारी तीन वाजता ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मुंबईच्या दिशेने धावणार आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ ताशी 120 किलोमीटर वेगाने धावेल. ती पुण्यामार्गे जाणार असल्यामुळे पुणेकरांना ‘वंदेभारत एक्स्प्रेस’चा सुखद प्रवास लवकरच अनुभवता येणार आहे.
अशी असेल वेळ
वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई वरून सोलापूर मार्गे गुरुवारी पुण्यात दाखल झाली. त्यानंतर सदर गाडी काही काळ थांबविण्यात आली. सायंकाळी चार वाजून 50 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. 16 डब्यांची ‘वंदेभारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. ती पुण्यात नऊ वाजता दाखल झाल्यानंतर ती मुंबईला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
गुरुवारी धावणार नाही
त्याच दिवशी दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी ती मुंबईहून सुटेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला दाखल होईल. त्यानंतर सोलापूरला रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस सुरू राहणार आहे. मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही एक्स्प्रेस धावणार नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.