आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न:पोलिस वेळेवर पोहोचल्याने तरुण वाचला; नोकरी न मिळाल्याने होता नैराश्यात

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी न मिळाल्याने तरुणाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणाने गळफास लावण्याची तयारी केली. याची खबर शेजारच्यांना झाली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस वेळेवर पोहचल्याने तरुणाला वाचवण्यास यश आले आहे. पुण्यात ही घटना उघडकीस आली आहे. विबोध दत्ताराम जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभयला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी त्याचे काऊन्सलिंग केले.

पोलिसांनी सांगितले की, 26 वर्षीय विबोध हा त्याच्या आई-वडिलांसोबत पुण्यातील अॅग्रेशन टॉवरमध्ये राहतो. घटनेच्या वेळी तो घरी एकटाच होता. त्याचे वडील सत्संग ऐकण्यासाठी गेले होते आणि आई मुंबईत ड्युटीवर होती. यादरम्यान त्याने हे पाऊल उचलले.

शेजाऱ्यांनी सांगितले - तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता
जाधवने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे शेजाऱ्यांना कळताच त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यामुळे परिसरात गस्त घालणारे पेट्रोलिंग पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. पाचव्या मजल्यावरील 504 क्रमांकाच्या खोलीत तो आत्महत्या करत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिस त्यांच्या खोलीबाहेर पोहोचले असता खोली आतून बंद असल्याचे त्यांना दिसले. खोलीची चावी त्यांच्याकडे असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. यानंतर खोलीचे गेट उघडल्याने तरुणाचा जीव वाचला.

केसगळतीमुळे तरुणाने केली आत्महत्या

हरियाणातील कर्नालमधील पिंगली गावात एका अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाला फासावर लटकलेला पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ त्यांना खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी सांगितले की, तो अनेक दिवसांपासून केसगळतीमुळे त्रस्त होता. येथे वाचा संपुर्ण बातमी.

व्हिडिओ काॅल चालू असतानाच तरुणीने घेतला गळफास​​​​​​​

लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या तरुणाला कुटुंबातून लग्नास विरोध झाला. यातून त्याने मुलीचे इतरत्र लग्न होऊ नये म्हणून मानसिक त्रास दिला. व्हिडीओ काॅलवर दरडावत असतानाच त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने व्हिडीओ काॅल सुरु असतानाच त्याच्यासमोरच गळफास घेतला. या मुलीचा 19 दिवसांनी उपचारादरम्यान आज दुपारी 12 वाजता मृत्यू झाला.

दिव्या दिलीप जाधव (वय 21, रा. हरीओमनगर, कानळदा रोड) असे मृत मुलीचे नाव आहे. तर नीलेश मंगलसिंग गायकवाड (रा. तारखेडा, ता. पाचोरा) असे मुलाचे नाव आहे. त्याच्यासह त्याची आई लक्ष्मीबाई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...