आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जदाराची आत्महत्या:पुणे शहर पोलिस दलातील दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; दोषी असल्याचे चौकशीत सिद्ध

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोटार घेण्यासाठी एका बँकेकडून कर्ज घेत ते न फेडता जमीनदार असलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी या जमीनदार व्यक्तीवर कर्ज भरण्यासाठी दबाव आणला जात होता. त्याला वॉरंट बजावत त्याच्या घरी जाऊन पैसे उकळून मानसिक त्रास दिला जात असल्याने त्या व्यक्तीने काही दिवसांपापूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यातील 2 पोलिस कर्मचारी दोषी असल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. यामुळे या दोन पोलिसांसह कर्ज न फेडणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आत्महते प्रकरणी किरण भातलावंडे (गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे), फौजदार भाग्यवान नामदेव निकम, पोलिस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राजेंद्र राऊत यांची मुलगी वैष्णवी राऊत हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज भरण्यास नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र राऊत आणि किरण भातलावंडे हे मित्र आहेत. किरण भातलावंडे यांनी काही दिवसांपूर्वी टाटा सुमो गाडीवर रघुवीर बिझनेस प्रा. लि. हैदरबाद यांच्या कडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी राजेंद्र राऊत यांना जामीनदार ठेवण्यात आले होते. मात्र, किरण भातलावंडे यांनी कर्ज भरण्यास नाकार दिला. यामुळे राऊत यांना कर्ज भरण्यास नोटीस येऊ लागली. राऊत यांनी किरण याला कर्ज भरण्यास नकार दिला.

मानसिक त्रास दिला

दरम्यान, त्यांना कर्ज भरण्यासाठी दबाव येऊ लागला. वॉरंट घेऊन समर्थ पोलिस ठाण्याचे फौजदार भाग्यवान नामदेव निकम, पोलिस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे हे दोघे वारंवार त्यांच्या घरी येत होते. तसेच त्यांच्या कडे पैसे मागत होते. राऊत यांनी त्यांना सात ते आठ हजार रुपये दिले होते. पैसे देऊनही त्यांना मानसिक त्रास दिला जात होता.

पोलिस दलात खळबळ

अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मुलीने तक्रार दिल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. यात हे दोघे पोलिस कर्मचारी दोषी आढळले. त्यामुळे कर्ज घेणारा किरण भातलावंडे आणि फौजदार भाग्यवान नामदेव निकम, पोलिस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे यांनी त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्या आत्महतेला जबाबदार ठरल्याने त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...