आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामूहिक आत्महत्या:लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने मुलांना फाशी देऊन आई- वडिलांची आत्महत्या

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घराच्या भिंतीवर लिहिली सुसाइड नोट, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय

आर्थिक विवंचनेतून दोन चिमुरड्यांना फाशी देऊन आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी येथील सुखसागरनगर येथे शुक्रवारी उघडकीस आली. अतुल दत्तात्रय शिंदे (३३ ),जया अतुल शिंदे (३२),ऋग्वेद अतुल शिंदे (६) अंतरा अतुल शिंदे (३, सर्व रा. सुखसागरनगर, मू. रा. परभणी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. लाॅकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या कुटुंबाने आत्महत्या केल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास सुखसागरनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे ओळखपत्र तयार करण्याचा व्यावसाय करतात. तसेच, त्यांचा २०१३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांसोबत त्यांचे मतभेद असल्याचे समजते. सुखसागरनगर येथे एका मित्राच्या घरात ते भाड्याने राहत हाेते. मागील काही दिवसांपासून लाॅकडाऊन सुरू असल्याने त्यांचे दैनंदिन काम ठप्प झाले हाेते. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. बुधवार आणि गुरुवारी दिवसभर घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा वाजवून पाहिला. मात्र, त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. फॅनच्या अँगलला नायलाॅनच्या दोरीने चाैघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सदर कुटुंबाने एका दिवसापूर्वीच आत्महत्या केली असावी, असा पाेलिसांना संशय आहे. पाेलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना केले.

व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

एका व्यवसायिकाने वडगाव धायरी परिसरात घरातील स्वयंपाकघरात छताच्या हुकाला दाेरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. स्वप्नील उत्तम रायकर (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात अक्समात मयतची नाेंद करण्यात आली आहे. रायकर हे धायरी परिसरातील रायकर मळा येथे वास्तव्यास हाेते. त्यांचा मंडप डेकाेरेर्टसचा व्यवसाय होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली. याबाबतची माहिती पाेलिसांना मिळाल्यानंतर सिंहगड पाेलीसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

मुलांना ठार केल्याने आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा

अतुल आणि जया शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या दाेन मुलांना गळफास देत त्यांचा खून केला. त्यानंतर दोघांनी गळफास घेतला. पाेलिसांनी घराच्या दरवाजाचे लाॅक ताेडून प्रवेश केल्यानंतर चारही जण एकाच लाेखंडी अँगलला लटकलेल्या अवस्थेत पाहून पाेलिसांसह शेजाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. याप्रकरणी मुलांचा खून केल्याने आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. आर्थिक अडचणीमुळे एकाचवेळी चार जण गेल्याने संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाॅकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अतुल याला काम मिळत नव्हते आणि आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याने त्यातून संपूर्ण कुटुंब संपविल्याची शक्यता दिसून येत आहे.

आत्महत्येपूर्वी भिंतीवर लिहून ठेवले

आत्महत्या करण्यापूर्वी अतुल आणि जया यांनी खाेलीतील भिंतीवर पेन्सिलने लिहून ठेवले की, ‘कृपया पाेलिसांनी कुणाला त्रास देऊ नये, आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वत:ला संपवत आहोत.’ त्याखाली पती-पत्नीने सही केली आहे. अतुल कर्जबाजारी हाेता का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...