आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुणे पोलिस अधीक्षकांचे दुपारचे जेवण होते अंगणातच

पुणे3 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
बाबा कलोना लाक्षसला थो थो करायला गेले...
  • मुलीने विचारल्यावर आई सांगते, कोरोनाला संपवायचेे असल्याने बाबा दूर राहतात

दररोज दुपारी बाबा घरी येतात, पण अंगणातच जेवायला बसतात. हे पाहून अडीच वर्षांची चिमुकली ज्ञानमुद्रा हिने कुतूहलाने विचारले, बाबा बाहेर का जेवतात, तेव्हा आईने सांगितले, कोरोना राक्षसाला संपवायचे असल्याने बाबा दूर राहतात. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या घरातील हा किस्सा आहे. 

कोरोनाचा विळखा वाढतोय तसा पोलिस, प्रशासनावरही कामाचा प्रचंड ताण आला आहे. व्हिडिआे काॅन्फरन्सिंग, फाेनद्वारे जिल्ह्यातील बैठकांचा आढावा पाेलिस अधीक्षक पाटील घेत असले तरी वेगवेगळ्या बैठका, कार्यालयीन कामकाज, विविध फायलींवरील सह्या, महत्त्वाच्या भेटीगाठी यामुळे त्यांचा दिवसभरात अनेकांशी संर्पक येताे. त्यामुळेच अखेर भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या उक्तीप्रमाणे पाटील यांनी कुटुंबीयांपासून दुरावा ठेवला आहे. विशेषत: पाटील यांनी घरातच एका खोलीत आपले बिऱ्हाड थाटले असून ते स्वतंत्र राहतात. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून अडीच वर्षांच्या चिमुकलीस आपल्या कुशीतही घेऊ शकले नाहीत.  अशीच परिस्थिती सध्या अनेक पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाली असल्याचे दिसून येत आहे. 

पाटील यांच्या कार्यकाळात 104 नक्षल्यांचे आत्मसमर्पण 

गडचिरोलीतील कार्यकाळात संदीप पाटील यांनी ‘नवजीवन आत्मसमर्पण’ योजना राबवल्याने दोन वर्षांत १०४ नक्षली शरण आले होते.ते मूळचे येलूर (ता.वाळवा)चे रहिवासी असून सातारा सैनिकी शाळेत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, गडचिरोलीतही काम केले आहे. त्यांची पत्नी प्रियंका यादव या कायद्याच्या पदवीधर आहेत.

मुलगी माझ्याकडे आतुरतेने पाहते, पण जवळ घेता येत नाही

कामावर जाताना पाेलिस युनिफाॅर्म घालून जावे लागत असल्याने दुपारी पुन्हा घरी जेवण्यासाठी आल्यानंतर ड्रेस काढून अंघाेळ करणे व आवरणे काेराेनामुळे शक्य हाेत नाही. घरात  आल्यानंतरही घराबाहेर कपडे काढून धुण्यास देतो. अंघाेळीस जाऊन दुसऱ्या  खाेलीत झाेपतो.  मुलगी लहान असल्याने उत्सुकतेने  घरी आल्यानंतर ती माझ्याकडे आतुरतेने पाहत असते, परंतु तिला जवळ घेता येत नाही. - संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

बातम्या आणखी आहेत...