आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात दोन बसची टक्कर होऊन भीषण अपघात झालाय. आज पहाटे पावणेपाच वाजता ही घटना घडली. यात स्टेअरिंगचा रॉड पोटात घुसल्याने सिटी बसचा चालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरूयत.
दोन्ही बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झालेत. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.
कशी घडली घटना?
पहाटे पावणेपाचच्या सुमारास हडपसर रामटेकडी बीआरटी मार्गावर ही घटना घडली. यावेळी एक ट्रॅव्हल्स पुण्याकडे चालली होती. त्यावेळी पुढून पीएमटी ही सिटी बस झाली. या दोन्ही बसची भीषण टक्कर झाली. ही धडक इतकी भयंकर होती की, स्टेअरिंगचा रॉड सिटी बसचा चालक सुनील कोलते यांच्या पोटात घुसला. त्यांच्यासोबत वाहक संदीप जराड आणि ट्रॅव्हल्सचा वाहक युसूफ शेखही गंभीर जखमीय. त्यांच्यावर उपचार सुरूयत.
रस्त्याची रुंदी कमी
अपघात प्रचंड भीषण होता. या धडकेत दोन्ही बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झालाय. दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झालेत. या मार्गावर बॅरिकेड्स लावलेले नाहीत. रस्त्याची रुंदी कमीय. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे समोर येतेय. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने हटवली आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.
प्रवासी किरकोळ जखमी
पहाटे अपघात झाला. यावेळी अनेक प्रवासी झोपेत होते. क्षणभर त्यांना काय झाले, हे समजलेच नाही. मात्र, बसच्या धडकेचा भीषण आवाज आला. त्यातही अनेक जणांना जोराचा हदरा बसल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. अनेक प्रवाशांना किरकोळ मारही लागला. मात्र, या घटनेत कोणाचाही मृत्यू अजून तरी झाला नसल्याचे समजते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.