आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील शिवराज्याभिषेक हा महत्वपूर्ण सोहळा आहे. हा सोहळा प्रत्येकाच्या मनामनामध्ये साजरा झाला पाहिजे, अशी शिवप्रेमींची भावना असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास अखंड उर्जास्थान आहे. पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाने आयोजित केलेला दिमाखदार शिवराज्यभिषेक सोहळा लोकांना शिवरायांचे विचार लोकांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत आहे. समाजप्रबोधानाचे पर्व असेच सुरू राहणे काळाची गरज आहे, असे मत सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.
छत्रपती राजाराम मंडळातर्फे आयोजन
छत्रपती राजाराम मंडळाच्यावतीने भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, विनोद सातव, उपाध्यक्ष अरुण गवळे, संग्राम शिंदे, सुनील निंबाळकर, स्वप्निल खडके, विनायक रासकर, जितेंद्र भुरुक, प्रतीक झोरे, मेघराज निंबाळकर, प्रसन्न पाटील, महेश पोंक्षे, मनोज शेंडे, रमाकांत गायकवाड उपस्थित होते.
निंबाळकरांची सिनेमाला मदत
प्रवीण तरडे म्हणाले की, छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांच्या फलटण येथील वाड्यामध्ये सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. निंबाळकर हे मोठे घराणे राजघराणे असून, त्यांच्यामुळे या सिनेमाला मदत झाली. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून गुढी उभारणे आनंदी प्रसंग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.