आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनमध्ये सप्तपदी:वेगवेगळ्या शहरात अडकले वधु-वराचे वडील, पुणे पोलिसांनी केली लग्नाची व्यवस्था आणि अधिकाऱ्याने केले कन्यादान

पुणे3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याच्या अमोनोरा क्लब येथे पोलिसांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. या दरम्यान, वऱ्हाडी पोलिसच होते. - Divya Marathi
पुण्याच्या अमोनोरा क्लब येथे पोलिसांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. या दरम्यान, वऱ्हाडी पोलिसच होते.
  • आई-वडीलांनी पुणे पोलिसांना केली होती विवाह लावण्याची आणि मुलीचे कन्यादान करण्याची विनंती

शहरात लॉकडाऊन दरम्यान अमोनोरा क्लब येथे 2 मे रोजी एक अनोखा विवाह झाला. यामध्ये स्थानिक पोलिस कर्मचारी वऱ्हाडी मंडळी झाली नाही तर एक पोलिसाने मुलीचे कन्यादान देखील केले. मुलगा आणि मुलीचे वडील दोघेही सैन्यात सेवा देत आहेत आणि लॉकडाउनमुळे दोघेही या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. 

वर अभियंता आणि वधू डॉक्टर, दोघेही पुण्यात नोकरी करतात

पुण्यात राहणारे आयटी अभियंता आदित्यसिंग बिष्ट आणि पुण्यातील डॉक्टर नेहा कुशवाह यांचे रविवारी लग्न झाले. मुलाचे वडील देवेंद्र सिंह हे सैन्यात कर्नल असून त्याची पोस्टिंग देहरादून येथे आहे. तर मुलीचे वडील अरविंदसिंग कुशवाह हे देखील सैन्यात डॉक्टर असून नागपुरातील आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. 

वधू-वराने लग्नात लॉकडाउनची काळजी घेतली. येथे दोन्ही हातात सॅनिटायझर दिसले.
वधू-वराने लग्नात लॉकडाउनची काळजी घेतली. येथे दोन्ही हातात सॅनिटायझर दिसले.

सोशल डिस्टन्सची घेतली दक्षता 

लॉकडाउनमुळे दोघांचे आई-वडील लग्नात येऊ शकले नाही. नेहा आणि आदित्य यांचा साखरपुडा फेब्रुवारीत झाला होता. 2 मे रोजी त्यांचा विवाह निश्चित केला होता. दोघांचे आई-वडील लॉकडाउनमध्ये अडकल्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना मुलीचे कन्यादान करण्याची विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान राखत हडपसरचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारी यांनी हा अनोखा विवाह आयोजित केला आणि मुलीचे कन्यादान देखील केले. यावेळी, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली गेली.

लग्नात वऱ्हाडी पोलिसच होते. सर्वांनी सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन केले.
लग्नात वऱ्हाडी पोलिसच होते. सर्वांनी सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन केले.