आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयसीआयसीआय बँकेत ब्रांच मॅनेजर असलेल्या व्यक्तीने एका ग्राहकास सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन देऊन तब्बल 27 लाख 46 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अशोक सूर्यकांत कदम (राहणार -पुणे )या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
याबाबत चेतन बळीराम इथापे (वय- 36, राहणार -वाघोली ,तालुका- हवेली, पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अशोक कदम हे आयसीआयसीआय बँक येथे मॅनेजर असून ते ब्रँच मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन एका ग्राहकाला दिले> त्यानंतर तक्रारदार चेतन इथापे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ब्रांच मॅनेजर अशोक कदम यांनी फोन पे, गुगल पे व एनईएफटीद्वारे 69 लाख 46 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर प्राप्त केले.
तक्रारदार यांच्या आयसीआयसीआय सिक्युरिटी पोर्टफोलिओ मध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोरेगावपार्क पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. वराळ हे करत आहे.
व्हाट्सअपद्वारे दीड लाखांची फसवणूक
एका अज्ञात मोबाईल धारकानी डेक्कन परिसरात राहणाऱ्या किशोर भालचंद्र फडके यांची बहीण हेमा दीक्षित हिच्या व्हाट्सअप डिस्प्ले प्रोफाईलचा गैरवापर करून किशोर फडके यांना त्यांच्या बहिणीस पैशाची गरज आहे असा खोटा मेसेज पाठवला. त्यानुसार त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात दीड लाख रुपये गुगल पे द्वारे घेऊन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे .याबाबत डेक्कन पोलिस पुढील तपास करत आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.