आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस असल्याची बतावणी करून लुटमार करणार्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासात अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाइल, मोबाइल असा ६५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना १८ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास घडली होती. श्रीकांत भरत कदम (वय ३२, रा. पांडवनगर,पुणे) आणि सुरज राजु धोत्रे (वय ३२ रा. जुनी वडारवाडी,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रक्षाराम बचराज वर्मा यांनी तक्रार दिली आहे.
जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पथकासह आरोपींचा शोध घेत होते. गुन्ह्यातील आरोपी वडारवाडी पसितरात थांबल्याची माहिती सहायक पोलिस फौजदार अविनाश भिवरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गोड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केली.
महिलेचा पाठलाग करून विनयभंग
महिलेकडे एक टक पाहून तिला ओळखत असल्याचे सांगून तिचा पाठलाग करून नंतर तिच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग करणार्या एकावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धायरी येथील एका 35 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून 2022 ते 17 डिसेंबर 2022 दरम्यान घडला. हा प्रकार सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे घडला अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.