आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हॉटेल व्यावसायिकाच्या घरात चोरी:चोट्यांनी लंपास केला 23 लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज, गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच धायरी येथील गणेशनगर परिसरात राहणारे हॉलेट व्यावयिक आशिष अंकुश पासलकर (वय-33) यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान हे कुटुंबिय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर गेले असताना हा प्रकार घडला.

3 चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून बेडरुम मधील कपाटातील ड्राव्हर मधील 569 ग्रॅम सोन्याचे दागिने, 340 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 23 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन नेला आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तीन अनोळखी चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस निकम करत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅंटीनमध्ये चोरी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील मुख्य शाखेत पहिल्या मजल्यावर असलेल्या नेटवर्क रुमचे मागील बाजुचे खिडकीला लावलेले प्लायवुड ताेडुन खिडकीतून चाेरटयाने आत प्रवेश केला. त्यानंतर नेटवर्क रुमचे जवळ असलेल्या कँटीनचे मॅनेजर रुमचा कडी काेयंडा लाेखंडी राॅडने उचकटून कपाटातील पाच हजार रुपये पळुन घेऊन जाताना आराेपी स्वप्नील मारुती गायकवाड (वय-21,रा.कासेवाडी,पुणे) यास पकडण्यास आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात चंद्रकांत तुळशीराम शिरसाट (वय-42) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.

लाॅटरी लागल्याचे सांगुन महिलेचे गंठण पळवले

उज्वला महाेदव गुरव (वय-57,रा.आंबेगाव,पुणे) या एक जानेवारी राेजी सकाळी साडेअकरा वाजता अांबेगाव परिसरातील दत्तनगर मधील टेल्काे काॅलनी येथून पायी दुकानात जात हाेत्या. त्यावेळी एक अनाेळखी इसम त्यांच्या जवळ येऊन त्याने तुम्हाला लाॅटरी लागल्याचे सांगुन त्यांना जवळील स्वाद हाॅटेल मध्ये घेून गेला. त्याठिकाणी त्यांना बाेलण्यात गुंतवून ठेऊन त्यांचे गळयातील अडीच ताेळे गंठणाची मागणी करुन त्याचे वजन केल्यावर, त्यांना फ्रीजचे राेख पैसे देताे असे म्हणून त्यांनी विश्वासाने दिलेले 75 हजार रुपये किंमतीचे अडीचताेळे वजनाचे गंठण त्यांना बाेलण्यात गुंतवून ठेऊन हाॅटेल मधून पसार झाला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...