आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी औषध देऊन कुत्र्याच्या तीन पिल्लांना केले ठार:पुण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल, पिल्लांचा त्रास होत असल्याने दिले विष

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुत्र्याच्या तीन पिल्लांना उंदीर मारण्याचे औषध खाण्यास देऊन ठार केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास हाेत असल्याने पुण्यातील तरुणाने विषारी औषध देत तीन पिल्लांना संपवले. या प्रकरणी तरुणावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली आहे.

नागेश साेनवणे (रा.रामनगर, वारजे,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी विराेधात अ्निकेत संजय राजपूत (वय-28,रा. वारजे माळवाडी,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एक मार्च राेजी घडली आहे.

मांसातून दिले विष

पुण्यात सिध्दार्थनगरमधील रामनगर परिसरात बापु घनगांवकर याचे माेकळया पडीक जागेत घर आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या तीन कुत्र्याच्या पिल्लांचा आरोपी नागेश साेनवणे यास त्रास होत होता. त्यामुळे त्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध मांसातून पिल्लांना खाण्यास दिले. तिन्ही पिल्लांचा विषारी औषधामुळे मृत्यू झाला.

आराेपीवर भारतीय दंड विधान संहिता कलम 428 नुसार महाराष्ट्र पाेलिस अधिनियम 119 चे ‘द प्रिव्हेनशन ऑफ अरुलटी अॅनिमल्स अॅक्ट 1960 चे कलम 11 सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास वारजे माळवाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस काळे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...