आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणी कारवाई:रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीसह दुचाकीस्वाराला उचलले, पुण्यातील नानापेठ परिसरातील वाहतूक पोलिसांची करामत, घटनेवर सर्वच स्तरांतून संताप

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नाना पेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी स्वारसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोईंगने (उचलून) नेली. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ शुक्रवारी समोर आल्यानंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वाहतूक विभागाने सांगितले की दुचाकी 'नो-पार्किंग' झोनमध्ये उभी केली होती आणि स्वार जाणीवपूर्वक टोइंग करताना त्यावर बसला होता.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता लोक वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या दरम्यान दुचाकीस्वाराला वाहतूक विभागाकडून उचलले जात होते, तो म्हणत होता, 'सर, माझी बाईक नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला उभा होतो. मी माझी बाईक पार्क केलेली नाही, मी लगेच निघतो आहे, कृपया माझ्यावर कारवाई करू नका. एवढे सांगूनही वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही आणि दुचाकीसह त्या व्यक्तीला उचलले नेले, असा आरोप आहे.

ज्याने व्हिडिओ शूट केला त्याच्याशीही गैरवर्तन
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, लोक आता प्रश्न विचारत आहेत की, चूक त्या तरुणाची असली तरी त्याला दुचाकीने अशा प्रकारे उचलणे योग्य आहे का? तो पडला असता तर जबाबदार कोण असते? या प्रकरणाबाबत असाही आरोप आहे की, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला, त्याच्यासोबतही दुचाकी उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले.

स्थानिक लोकही वाहतूक विभागावर नाराज आहेत
घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी अभिजीत ढवळे म्हणाले, 'नानापेठ परिसरातील वाहतूक पोलीस सामान्य नागरिकांना सतत त्रास देत आहेत. ते आमच्या दुकानासमोर गाडी उचलतात आणि काहीतरी दिल्या-घेतल्यानंतर ते गाडी सोडून लगेच निघून जातात. वाहतूक विभागाचे डीसीपी श्रीराम म्हणाले, 'आम्ही नाना पेठ परिसरातील या घटनेचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. त्याच्या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...