आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सेल्फीचा नाद तरुणांच्या अंगलट, नदीत दोन तरुण बुडाले

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात सेल्फी काढण्यास उतरलेले दोन तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सहा वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल व डेक्कन पोलीस दाखल झाले आहेत.

ओंकार तुपधर( वय १८) आणि सौरभ कांबळे (वय २०, दोघेही रा. ताडीवाला रोड) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार आणि दोन मित्र बाबा भिडे पुलानजीक फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. यावेळी तिसऱ्या मित्राने व नागरिकांनी याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे. पण त्यांचा शोध घेतला जात आहे, असे अग्निशमन दलाचे अधिकारी नाईकनवरे यांनी दिली आहे. दरम्यान, या ठिाकणी तरुणांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...