आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेकायदेशीर सावकारी करून पैशांसाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अनधिकृत सावकाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दहा टक्के व्याजाने घेतलेल्या 75 हजार रुपयांपोटी एक लाख 86 हजार रुपये देऊनही आणखी पैशांची मागणी करणाऱ्या सावकारास खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली आहे.
विशाल किसन धोत्रे (वय 41, रा. प्रतीकनगर, येरवडा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दाखल करत दाद मागितली होती. तक्रारादाराने धोत्रे याच्याकडून दहा टक्के व्याजाने 75 हजार रुपये उधारीवर घेतले होते. व्याजापोटी तक्रारदाराने एक लाख 86 हजार रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात वेळोवेळी दिले होते.
त्यानंतर धोत्रे याने तक्रारदाराकडे आणखी 75 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने तक्रारदाराला दिली होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल धोत्रेला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपीवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, 45 तसेच भादवि कलम 385 ,504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन करत आहे.
पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, प्रमोद सोनवणे, रवींद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, हेमा ढेबे आदींनी ही कारवाई केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.