आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य:पुणे विद्यापीठ प्रशासनाचे धोरण; अधिसभेचा समारोप

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी विद्यापीठाची अधिसभा संपन्न झाली. या अधिसभेत विद्यार्थी आणि शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. अधिसभेत विद्यार्थ्यांच्या या हिताचे अनेक निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अधिसभेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी काम पाहिले. तर प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अधिसभेचे सचिव म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी काम पाहिले. यावेळी विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या दोन दिवसीय सभेत अधिसभा सदस्यांनी अनेक प्रस्ताव मांडले, तसेच प्रश्नोत्तराच्या तासात विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले.

दरम्यान या अधिसभेत अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामगिरीचा अहवाल सादर केला.

दरम्यान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर तयार करण्यात येणार असल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगत त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले. तसेच भारतीय विज्ञान परिषदेत विद्यार्थी सहभाग, भाषाशास्त्र व अनुवाद अभ्यास केंद्र, मिलेट अभ्यास केंद्र, पुस्तक अनुवाद, विद्यापीठ संगीत भवन भौतिशास्त्र विभागाचा विस्तार आदींसाठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे डॉ.सोनवणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

संकटग्रस्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ज्या विद्यार्थ्यांना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांच्या पालकांना दुर्धर आजाराने ग्रासाले आहे अशा विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रस्ताव डॉ.अपूर्व हिरे आणि अशोक सावंत यांनी अधिसभेसमोर ठेवला, त्याला प्रसेनजीत फडणवीस यांनी अनुमोदन दिले. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही अधिसभा अध्यक्षांनी जाहीर केले. अधिसभा सदस्यांचे आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...