आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणूक:5 प्रभागांचे निकाल 8 वाजेपर्यंत जाहीर, खुल्या प्रवर्गाची मतमोजणी सुरू

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेची निवडणूक यंदा शैक्षणिक वर्तुळापेक्षा राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय बनली. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आपापल्या सोयीचे उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे अधिसभेसाठीच्या निवडणुकीसाठी अनेक पॅनेल्स रिंगणात होती. राजकीय पक्षांच्या सोबतीने विद्यार्थी संघटनाही या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने सहभागी झाल्या होत्या. परिणामी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्तुळापेक्षा या निवडणुकीचा राजकीय आखाडा झाल्याची टीकाही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे 13 हजार 512 मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13 हजार 995 मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे 14 हजार 101 मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे 13 हजार 342 मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर 15 हजार 649 मतांनी विजयी झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. 500 सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दरम्यान सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे , ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...