आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामंजस्य करार:पुणे विद्यापीठाने केले तीन वर्षांत दीडशे नामांकित संस्थांशी सामंजस्य करार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घोडदौड कायम आहे. मागील तीन वर्षात विद्यापीठाने १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. याचा लेखाजोखा नुकत्याच झालेल्या कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी मांडला. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँक, द्विलक्षी अभ्यासक्रम, क्रेडिट बेस चॉइस सिस्टिम, संशोधन आदींबाबत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...