आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक:10 जागांपैकी 9 जागांवर भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार विजयी; मविआला धक्का

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीपुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवला आहे. विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचा पराभव केला आहे. 10 जागांपैकी 9 जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले आहेत. तब्बल 20 तास ही मतमोजणी चालली.

राज्यात सत्ताबदल होताच छोट्या निवडणुकांमध्येही भाजप महाविकास आघाडीला धक्का देत आहे. पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या 10 जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजनी ही मंगळवारी विद्यापीठातील सभागृहात सकाळी 8 वाजता सुरू झाली. ही मतमोजणी बुधवारी पहाटे पर्यन्त सुरू होती. तब्बल 20 ते 21 तास देखील भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळवत. महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

मतमोजनीच्या पहिल्या फेरीतच 10 पैकी 8 जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले. तर दुसऱ्या फेरीत आणखी एक उमेदवार निवडणून आला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले थेट पॅनल यावेळी उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले. भाजपशी संबंधित आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या गटातील उमेदवारांचे ‘विद्यापीठ विकास मंच’ पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, आदी पक्ष, संघटनांचे एकूण 37 उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले होते.

मंतमोजणीच्या पहिल्या फेरीतच विद्यापीठ विकास मंचचे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे 13 हजार 995 मतांनी निवडून आले. भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे 14 हजार 101 मतांनी निवडून आले. अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे 13 हजार 512 मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे-पाटील हे 13 हजार 342 मतांनी निवडून आले. हे निकाल हाती येताच विद्यापीठ विकास मंचने या निवडणुकीत आघाडी मिळवली हे स्पष्ट झाले. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलला एकही जागा पहिल्या फेरीत मिळवता आली नाही. महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी सर्वाधिक 15 हजार 649 मते मिळवत निवडणूक आल्या. खुल्या प्रवर्गात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ प्रसेनजीत फडणवीस हे देखील पहिल्या फेरीतच निवडून आले.

खुल्या प्रवर्गातून सागर वैद्य आणि युवराज नरवडे हे देखील दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. बुधवारी सकाळी दोन निकाल लागले. यात महाविकास आघाडीच्या एक उमेदवार विजयी झाला. एकूण 10 जागांवर 9 उमेदवार हे विद्यापीठ विकास मंच यांचे निवडणूक आले आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकासआघाडी शिवसेनेचे उमेदवार बाकेराव बस्ते यांचा खुल्या गटातून विजय झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...