आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे अनलॉक:पुणे 10 दिवसांनंतर आजपासून अनलॉक, मात्र आधीप्रमाणेच निर्बंध कायम राहणार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यास व्यापारांचा विरोध

पुण्यातील मागील दहा दिवसांचा लाॅकडाऊन संपुष्टात येत असला तरी नागरिकांवर यापुढील काळात ही आधीप्रमाणेच निर्बंध असणार आहे. राज्यसरकारचा लाॅकडाऊन 31 जुलै पर्यंत असल्याने ताेपर्यंत आधीची बंधने आहे त्याप्रमाणेच असणार आहे. त्यानुसार बाजार पेठेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात यादरम्यान चालू राहू शकतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले. 

प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवेची दुकाने 9 ते 2 या वेळेत सुरू राहणार 

महानगर पालिकेा हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. 65 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला, विक्री औषध विक्री रुग्णालय, दूध विक्री, रेशन 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार आहे.

5 दिवस अनलॉक, 2 दिवस लॉकडाउनवर विचार 

पुणे व्यापारी असाेसिएशनने प्रशासनाकडे दाेन पत्र आम्हास दिली असून त्यात एका पत्रात शनिवार, रविवार पूर्णपणे लाॅकडाऊन असावा तर दुसऱ्या पत्रात मंगळवार आणि बुधवार लाॅकडाऊन असावा अशी मागणी केली आहे. त्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरातील बाजार पेठेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात यादरम्यान चालू राहतील, दुकानदारांना सम-विषम प्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी असणार आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून याचा विरोध होत आहे. 

पुणे महानगरपालिका क्षेत्रात 59 टक्के रुग्ण बरे झाले 

लाॅकडाऊन काळात देशातील सर्वाधिक तपासण्या पुणे जिल्हयात झाले आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 59 टक्के रुग्ण बरे झाले असून मृत्युदराचे प्रमाण 2.51 टक्के आहे. लाॅकडाऊनचे काळात रुग्ण ट्रेसिंग अधिकाधिक करणे आणि त्यांचेवर याेग्य आैषध उपचार करणे आणि संसर्ग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. टेस्टींग क्षमता वाढविण्यात आली आहे.

जुलैअखेर पुण्यात 27 हजार काेराेना रुग्ण होतील

पुणे शहरात काेराेना रुग्णांचा संसर्ग माेठया प्रमाणात झालेला असून दहा दिवसांचे लाॅकडाऊन काळात दरराेज दहा हजारपेक्षा अधिक चाचण्या करुन अधिकाधिक काेराेना रुग्ण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या पुणे शहरात 14 हजार 700 अॅक्टीव्ह काेराेना रुग्ण असून पिंपरी चिंचवड मध्ये पाच हजार 53, ग्रामीण भागात दाेन हजार 988, नगरपालिका क्षेत्रात 810 तर कॅन्टाेन्मेंट भागात 767 अॅक्टीव्ह रुग्ण काेराेना उपचार रुग्णालयात घेत आहे. मात्र, पुणे शहरातील काेराेना रुग्णांची संख्या 31 जुलै पर्यंत 27 हजार पर्यंत वाढू शकते असा अंदाज असून त्यादृष्टीने प्रत्येक रुग्णालयाचे पाठीमागे लागून व्हेंटिलेटर, आयसीयू बेड व इतर बेडची व्यवस्था युध्दपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी साैरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.