आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध शिथिल:पुण्यात येत्या सोमवारपासून कॉलेज होणार सुरू; लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. यामुळे याबाबत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केली.

शिक्षण क्षेत्र पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला सरकारने योग्य प्रतिसाद दिला आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. पुण्यात राज्य आणि देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांपाठोपाठ आता सर्व वरिष्ठ महाविद्यालययेही येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा आदेश दिला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महाविद्यालयात प्रवेश करताना विद्यार्थ्यांना लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारपासून म्हणजेच 11 तारखेपासून पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे पवार म्हणाले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातील महाविद्यालयाचा समावेश यामध्ये आहे. पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.

निर्बंध शिथिल केल्यामुळे हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंतपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. खासगी कार्यालये शंभर टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. तर येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...