आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिबट्या नर व मादी लोकवस्तीमध्ये सैर करत असल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचप्रमाणे मोबाईलमध्येही शूट करण्यात आलेला आहे.
वारंवार होणाऱ्या या घटना पाहता मंचर शहरालगत चांडोली रोडवर थोरात मळ्यात पिंजरा लावण्यात मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चांडोली खुर्द येथील खालच्या मळ्यात रविवारी ऊसतोड सुरू असताना अचानक दोन बिबटे दिसल्याने तिथल्या मजुरांनी काम सोडून पळ काढला.
मजुरांनी ऊसतोड थांबवून धूम ठोकली
ज्ञानेश्वर इंदोरे यांच्या शेतात ही घटना घडली. उसाच्या फडातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला.त्यामुळे सर्व मजूर घाबरले.तेव्हढ्यात अचानक समोरच दोन बिबटे दिसले बिबट्यांना पाहताच मजुरांनी ऊसतोड थांबवून शेताबाहेर धूम ठोकली. त्यानंतर शेतकरी इंदोरे यांनी तत्काळ वनविभागाला कळवले. वन विभाग कर्मचार्यांचे पथक दाखल झाले. पण तोपर्यंत ते बिबटे तिथून पसार झाले.
व्हिडिओत काय?
पुण्यात बिबट्या दिसण्याच्या घटना काही नवीन नाहीत. याआधी देखील अनेकदा पुणेकरांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे. मात्र लोकवस्तीमध्ये अशाप्रकारे बिबट्यांचा वावर हे पहिल्यांदाच पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओत यावेळी बिबट नर पुढील रस्त्यावर येऊन रस्त्यावर झोपल्याचे दिसून येत आहे. तर मादीसोबत रमतगमत चालतानाही दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.