आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातल्या विमाननगर परिसरात असलेल्या आयटी बिझनेस हबमध्ये आग लागली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्यात. युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीचे नेमके कारण अजून समजले नाही. आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी वा मृत झाले नाही. मात्र, आगीमुळे नुकसान झाल्याचे समजते.
कर्मचाऱ्यांची पळापळ
पुण्यातल्या विमाननगर, हिंजवडी परिसरात मोठ-मोठे आयटी बिझनेस हब आहेत. मंगळवारी दुपारी विमाननगर परिसरातल्या एका आयटी बिझनेस हबमध्ये आग लागली. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते. आग लागल्याचे समजताच एकच हलकल्लोळ उडाला. अनेकांनी पळापळ सुरू केली.
अग्निशमनच्या गाड्या दाखल
आग लागल्याचे अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. आयटी हबमधून सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान
आतापर्यंत आग कशामुळे लागली, हे समजले नाही. या घटनेत आतापर्यंत तरी कोणालाही इजा झाल्याचे, वा जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीमुळे आयटी हबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.
दोन दिवसांत तिसरी घटना
पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला. या गोदामाच्या शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोदाम होते. मात्र, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे पुढील अनर्थ टळला. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये बॅंकेलाही आग लागल्याची घटना घडली. यात महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती आहे.
संबंधित वृत्तः
पुण्यात गोदामाला भीषण आग, होरपळून 3 कामगारांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.