आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पा सेंटरच्या नावाखाली उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरातील सॉलिटर बिझनेस हब मध्ये आमयरा स्पा याठिकाणी सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 19 ते 27 वयोगटातील सहा तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केल्याची माहिती बुधवारी दिली.
याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात मनिकंठ राहुल नायडू (वय- 20 ,राहणार - थेरगाव,चिंचवड, पुणे), विशाल अगरवाल ,नायडू बाई, नितीन माने या आरोपीविरोधात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मनीकंठ नायडू याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक इमरान खान सिकंदर नदाफ यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी यांनी पीडित मुलींना वेश्याव्यवसाय करता प्राप्त करून घेतले त्यांना पैशाचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून, मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असताना मिळून आल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी सुटका करण्यात आलेल्या तरुणी या पुण्यातील पिंपळे गुरव ,थेरगाव, विमाननगर, निगडी आदी भागात राहणाऱ्या तरुणी आहेत. यासंदर्भात पुढील तपास विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक( गुन्हे) एस माळी करत आहे.
पुणे स्टेशन परिसरात प्रवाशाचा मोबाइल हिसकावणारा अटकेत
पुणे स्टेशन परिसरात प्रवाशाचा मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली.
नोएल ॲलन शबान (वय २४, रा. साधू वासवानी पुलाजवळ, क्वीन्स गार्डन) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सॅम टेरेन्स राॅबर्ट (वय ३१, रा. भोसरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राॅबर्ट पुणे स्टेशन परिसरात पीएमपी थांब्यावर बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा शबानने राॅबर्ट यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. राॅबर्ट यांनी चोरट्याचे वर्णन पोलिसांना दिले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. शबान सराइत चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.