आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार जोडणीचे कामकाज:पुणे जिल्ह्यात 4 लाख मतदारांची मतदान यादीतील तपशीलाशी आधार जोडणी पूर्ण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या असून जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख मतदारांची मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडणी पूर्ण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच, ऑनलाईन पद्धतीने 1 ऑगस्ट 2022 पासून सदर आधार जोडणीचे कामकाज सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 78 लाख 69 हजार 276 इतके मतदार आहेत. त्यापैकी आज अखेर 3 लाख 82 हजार 351 मतदारांची आधार जोडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंदापूर, आंबेगाव, भोर, खेड, मावळ या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघातील मतदारांनी शहरी मतदार संघातील मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे.

अॅपवर सुविधा उपलब्ध

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळ, वोटर पोर्टल किंवा वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये ॲप स्थापित करुन आधार जोडणी करता येईल. यामध्ये प्रामुख्याने इंदापूर, आंबेगाव, भोर, खेड, मावळ या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघातील मतदारांनी शहरी मतदार संघातील मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे विशेष शिबिर माध्यमातून शहरी भागातील प्रतिसाद वाढवणे यावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.

विशेष शिबीर आयोजित

त्यादृष्टीने याबाबत 11 सप्टेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आधार जोडणीबाबतत विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...