आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:लाच प्रकरणात महिला न्यायाधीशास अटक, सोयीच्या निकालासाठी 50 हजारांची लाच

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फौजदारी खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी एका महिलेच्या मध्यस्थीने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना दीपक जतकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

या प्रकरणात मदत करणारी महिला शुभावरी गायकवाड (२९, रा. तळेगाव, पुणे), सुशांत केंजळे (३५, रा. रावेत, पुणे), बडतर्फ पाेलिस निरीक्षक भानुदास जाधव (चेंबूर, मुंबई) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तक्रारदार स्वप्निल शेवकर (रा. इंदाेरी, पुणे) हे कडजाई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. अमूल दूधकडून वडगाव न्यायालयात फाैजदारी खटला आला असल्याची नोटीस घेऊन एक महिला त्यांच्या घरी आली. या प्रकरणाचा निकाल बाजूने लावून देऊ, असे सांगून त्यांच्याकडून ५ लाखांची लाच मागण्यात आली. तडजाेडीअंती अडीच लाख रुपये मागण्यात आले. न्यायाधीश अर्चना जतकर यांचे नाव या प्रकरणात आल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, ताे फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही संबंधित अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे जतकर या एसीबीसमोर हजर झाल्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायाधीश जतकर यांनी गुन्ह्यावेळी दाेन मोबाइल व सिम कार्ड वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. बडतर्फ पाेलिस निरीक्षक जाधव, केंजळे यांना जतकर यांनी ४ फोन केल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...