आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक जाणिवेतून उभारलेले कार्य प्रेरणादायी व दिशादर्शक:सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार यांचे प्रतिपादन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मातापित्याचे संस्कार, शिकवण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. सुषमा व संजय चोरडिया यांनी समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी, दिशादर्शक व कौतुकास्पद आहे असे मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार यांनी केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शकुंतला व शांतीलाल कोठारी दाम्पत्यास 'बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.

'सूर्यदत्त'च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, माईंड ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, स्नेहल चोरडिया, प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते.

पिढी घडवण्याचे काम

मणियार म्हणाले,चोरडिया परिवाराचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नाना पेठेत मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदात वावरणाऱ्या चोरडिया यांनी चांगल्या पदाची नोकरी सोडून पिढी घडवण्याचे काम हाती घेतले आहे. व्यावसायिक संस्था न करता अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या.

आम्ही सर्वच कॅन्सर पीडित

नमिता कोहोक म्हणाल्या, जोखमीशिवाय यश मिळत नाही, यावर माझा विश्वास आहे. जेव्हा परिस्थिती परीक्षा घेते तेंव्हाच जिद्द निर्माण होते, याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. आपण कसे वागतो हे लोक लक्षात ठेवतात. बोलणे गोड असावे. या स्पर्धेत आम्ही सर्वच कॅन्सर पीडित होतो. प्रत्येकीनेच आपल्या शाररिक, मानसिक अडचणींशी झगडा करत यश मिळविले आहे.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. सामाजिक व धार्मिक कार्यातून ज्यांनी आम्हाला घडवले त्या माता-पित्याच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. त्यांनी दिलेला संस्कार, शिकवण पुढील पिढीला देण्याच्या उद्देशाने, राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देऊ शकणारे युवक घडविण्यासाठी सूर्यदत्त शिक्षण संस्था नेहमीच अग्रस्थानी राहिल, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...