आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुळशी तालुक्यातील महाळुंगे गावचा रहिवासी असलेला कुस्तीपटू स्वप्नील पाडाळे (वय-२८) हा बालेवाडी येथे मुलांसाेबत व्यायम करत असताना बुधवारी सकाळी सहा वाजता त्यास हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
स्वाप्नील पाडाळे हा अविवाहित हाेता आणि त्याच्यामागे आईवडील व एक छाेटा भाऊ असा परिवार हाेता. मुळशी तालुक्यातील गावी त्याचे आईवडील शेती करुन उदरनिर्वाह करतात. स्वप्नील यास लहानपणापासून कुस्तीची आवड असल्याने ताे कुस्तीची तयारी करुन वेगवेगळया स्पर्धेत उतरत हाेता.
महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये तीन वेळा त्याने पदक प्राप्त केले असून खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत ही दिखामदार कामगिरी करत पदक मिळवले हाेते. कात्रज येथील मामासाहेब माेहाेळ कुस्ती संकुलात त्याने नुकत्याच झालेल्या एन.आय.एस कुस्ती काेच परीक्षेत ताे राज्यात प्रथम क्रमांकाने पास झालेला हाेता.
सध्या बालेवाडी येथे मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम ही ताे करत हाेता. बुधवारी सकाळी सहा वाजता ताे मुलांसाेबत मैदानावर व्यायम करत असताना, जाेर मारण्याचा व्यायम केल्यावर ताे बसल्यानंतर त्यास अचानक घाम आल्यानंतर ताे बेशुद्ध पडला. त्यातच त्याला हदय विकाराचा झटका आल्याने जागीच त्याचे निधन झाले.
यानंतर त्याच्या मित्रांनी त्यास तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता हलवले परंतु त्यापूर्वीच त्याची प्राणज्याेत मालवल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. युवा कुस्ती खेळाडू, प्रशिक्षक याचे अशाप्रकारे अकाली निधन झाल्याने कुस्ती क्षेत्रातील मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे.
घरातील परिस्थिती हालाखीची
स्वप्नील याच्या घरातील परिस्थिती हालाखीची असून तो घरातील कमवता सदस्य असल्याने घराचा आर्थिक डोलारा ही ढासळला आहे. दहा वर्षापासून तो कुस्ती क्षेत्रात खेळाडू म्हणून खेळत होता आणि आता प्रशिक्षक म्हणून काम करण्यास त्याने सुरववात केली होती. त्याच्या अशाप्रकारे अकाली निधनाने म्हाळुंगे गवावावर ही शोककळा पसरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.