आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएफएक्ससीएल या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून तीन जणाची दहा लाख 70 हजार रुपयांची फसवणुक केल्याने येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. गुंतवणुकदारास गुंतवणुक केल्यास दरमहिना 22 टक्के दराने परतावा देण्याचे अमिष आराेपींनी दाखवले हाेते, अशी बाब पोलिस तपासात समाेर आली आहे.
याप्रकरणी दिनेश मल्हारी सन्नापुरी (वय-45), किशाेर शंकर चेन्नुर (40) आणि याेगिता किशाेर चेन्नुर (35) या आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विक्रम गाैतम साेंडे (वय-38,रा.वाघाेली,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिलेली आहे. सदरचा प्रकार डिसेंबर 2020 ते आजपर्यंत घडलेला आहे. सदर आराेपींनी आपसात संगनमत करुन तक्रारदार विक्रम साेंडे यांना एफएक्ससीएल कंपनीचे एजंट असल्याचे भासवले. संबंधीत कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना 22 टक्के प्रतिमहिना माेबदला मिळेल असे अमिष दाखवून तक्रारदार व इतर दाेनजण यांचा विश्वास संपादन करुन सदर गुंतवणुकदारांना कंपनीत गुंतवणुकी करीता वेगवेगळया खात्यावर एकूण दहा लाख 70हजार रुपये रक्कम भरण्यास भाग पाडुन त्यांना 22 टक्के दराने परतावा न देता तसेच त्यांची मुळ गुंतवणुकीची रक्कम परत न करता आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे करत आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
इन्स्टाग्राम या साेशल मिडियाच्या माद्यमातून एका 16 वर्षीय मुलीशी एका तरुणाने ओळख केली. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना, देखील सदर आराेपीने तिला मागील दाेन वर्षापासून वेळाेवेळी मेसेज करुन तिला व तिच्या वडीलांना मारण्याची भिती दाखवून तिला भेटण्यासाठी भाग पाडले. सदर भेटीवेळी तिच्याशी जबरदस्तीने लगट करण्याचे उद्देशाने तरुण मागे लागल्याने मुलीच्या 41 वर्षीय आईने काेथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अभिजीत रमेश मेणे (वय-22,रा.शिवणे,पुणे) यास अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.