आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:हुल्लडबाजी जीवावर बेतली; मित्राने अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यात धरणात हुल्लडबाजी करणे एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला आहे. खडकवासला धरणात मित्रांसोबत पोहताना केलेल्या हुल्लडबाजीमुळे एका 18 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली घेत, धरणातून युवकाचा मृतदेह बाहेर काढला. योगेश नवले असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही दिवसांपुर्वीच योगेश कामासाठी पुण्यात आला होता. योगेश नवले त्याच्या चार मित्रांसह सुट्टी असल्याने पोहण्यासाठी खडकवासला धरणात गेला होता, त्याचदरम्यान ही घटना घडली आहे.

सुट्टी असल्याने गेले पोहायला

सुट्टी असल्याने योगेश आणि त्याचे चार मित्र खडकवासला धरणात रविवारी पोहण्यासाठी गेले होते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने योगेशचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश पाण्यात बुडाल्यानंतर ही माहिती मिळताच पोलिस आणि पीएमआरडीए प्रशासन, अग्निशमन दल आणि हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शोधून काढला.

योगेश मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील

मृत योगेश नवले हा अहमदनगर जिल्ह्यातील राशिन येथील रहिवासी आहे. तो काही दिवसांपुर्वीच कामासाठी पुण्यात आला होता. रविवार पेठेतील एका दुकानात तो काम करत असे, मात्र रविवारी सुट्टी असल्याने योगेश आणि त्याचे मित्र खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यात धरण परिसरात केलेल्या हुल्लडबाजीमुळे योगेश नवले याला आपला जीव गमवावा लागला आहे.

पाच मित्रांची हुल्लडबाजी

रविवारी कामाला सुट्टी असल्याने योगेश नवले आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी खडकवासला धरणात गेले होते. योगेश व इतर चौघे चौपाटीजवळ खडकवासला धरणात उतरले होते, अशी माहिती आहे. पाचही मित्रांची मिळून पाण्यात हुल्लडबाजी सुरू असल्याची बाब देखील समोर आली आहे. मित्रांनी बाहेर आल्यावर अंगाला माती लावल्याने योगेश अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरला अन त्याचा बुडून मृत्यू झाला. हवेली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...