आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाचे माहेरघर आणि सुधारकांचा वारसा जपणाऱ्या पुण्यात मुलींच्या जन्मदराचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा याेजनेअंर्तगत जिल्हा परिषदेने दर हजारी मुलांबराेबर मुलींचे प्रमाण 912 पेक्षा कमी असलेल्या गावांची माहिती एकत्रित केली. त्यानुसार जिल्ह्यातील 201 गावात बाल लिंग गुणाेत्तराची कमतरता आढळली.
कार्यशाळेचे आयोजन
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेत ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ याेजनेअंर्तगत बाल लिंग गुणाेत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकारीऱ्यांकरिता महिला आयाेगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आज कार्यशाळेचे आयाेजन केले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिली आहे.
कुठे प्रमाण कमी?
सदर बाल लैंगिक गुणाेत्तरच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने प्रत्येक गावातील ग्रामपंचायत हद्दीतील शून्य ते सहा वयाेगटातील मुला-मुलींची संख्या माेजली आहे. त्यानुसार, आंबेगाव तालुक्यातील 22 गावे, बारामती तालुक्यातील 9 गावे, भाेर तालुक्यात 12 गावे, दाैंड मधील 12 गावे, हवेलीतील 12 गावे, इंदापूर परिसरातील 12 गावे, जुन्नर मधील 16 गावे, खेड तालुक्यातील 26 गावे, मावळ तालुक्यातील 10 गावे, मुळशी मधील 18 गावे, पुरंदर तालुक्यातील 21 गावे , शिरुर परिसरातील 11 गावे आणि वेल्हा तालुक्यातील 9 गावात बाल लैंगिक गुणाेत्तराची कमतरता आढळली.
सरपंच राहणार उपस्थित
भाेर तालुक्यातील उंबरे गावात सर्वात कमी 422 लिंग गुणाेत्तर आढळून आले आहे. तर भाेर तालुक्यातच पान्हवळ गावात 474 लिंग गुणाेत्तर दिसून आले आहे. बारामती तालुक्यातील अजंनगाव येथे दर हजारी 459 इतके कमी लिंग गुणाेत्तरचे प्रमाण मिळून आले आहे.अशाचप्रकारे खेड तालुक्यातील येणवे बुद्रुक, चिंचबाईवाडी व अखरवाडी या गावात 500 पेक्षा कमी लिंग गुणाेत्तरचे प्रमाण आढळून आले आहे. सदर 202 गावातील ग्रामसेवक, सरपंच, पाेलिस पाटील यांना सदर कार्यशाळेत आमंत्रित करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.