आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणाची धडक कारवाई:पुणे जिल्हा परिषदेच्या 800 शाळा अंधारात, वीजबिल न भरल्याने महावितरणाने केला विद्युत पुरवठा खंडित

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा परिषदेच्या 800 शाळांतील वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यात 792 शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याता आला असून, 128 शाळांमधील विजेचे मीटर काढून नेण्यात आले आहे. महावितरण पथकाने ही कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण तीन हजार 639 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी फक्त दोन हजार 847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शाळांनी वीजबिल न भरल्याने महावितरणकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडे निधी नाही
महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर जिल्हा परिषदेकडे सीईओ आयुष प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "या शाळांचे वीज बिले भरण्यासाठी निधीस उपलब्ध नाही."

सुळेंच्या मतदार संघातील 437 शाळांचा समावेश

महावितरणाने कारवाई केलेल्या 800 शाळांपैकी 437 शाळा या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील आहे. त्यात इंदापूर 194, शिरूर 146, मुळाशी 50, भोर 74, दौंड 52, खेड 46, वेल्हा 32, आंबेगाव 34, बारामती 35, हवेली 13, जुन्नर 41 शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वाढीव वीज बिल आल्याचा शिक्षकांचा आरोप

कोरोनाकाळात जवळपास दोन वर्ष सर्वच शाळा बंद होत्या. त्यादरम्यान अनेक ठिकाणी वाढीव वीज बिल आल्याच्या घटना घडल्या आहेत. तर वीज बिल न भरल्याने धडक कारवाई करत महावितरणाने वीजपुरवठा खंडित केला आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत शाळांमध्ये वीजच नसेल तर विद्यार्थ्यांचे विजेवर अवलंबून असणारे संगणकाचा सराव, प्रयोग शाळेतील प्रयोग कशाप्रकारे चालणार याबाबत मोठा संभ्रम शिक्षक व पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...