आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:शेती फर्ममध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 24 जणांना 14 काेटींचा गंडा

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए. एस.अ‌ॅग्री अँड अ‌ॅक्वा एलएलपी या शेती फर्म मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून २४ जणांची तब्बल १३ काेटी ८२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहा आराेपींवर चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात आर्थिक फसवणुक व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध अधिनियम १९९९ चे कलम ३,४, नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत सुबाेध जमनलाल गाेएंका (वय-६३,रा.गहुंजे, पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी प्रशांत झाडे ( रा.अंबरनाथ ,ठाणे), राेहन मताले, संदेश गणपत खामकर (रा.नाशिक), जयंत रामचंद्र बांदेकर (रा.मुंबई), कमलेश महादेवराव ओझे ,ए.एस.अ‌ॅग्री अँड अ‌ॅक्वा एलएलपी मधील इतर जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन २०१९ ते आतापर्यंत घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आराेपींनी संगनमताने कट रचून ए.एस.अ‌ॅग्री अँड अ‌ॅक्वा एलएलपी शेती फर्मचे माध्यमातून गुंतवणूक केल्यास माेठा परतावा मिळेल असे अमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन तसेच इतर २३ गुंतवणुकदारांची संबंधित रकमेची फसवणूक केली आहे. हा गुन्हा पुढील तपासाकरिता सायबर पाेलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

ऑनलाइन अडीच लाखांची फसवणूक

पिसाेळी येथे राहणाऱ्या जुबेर शब्बर शेख (वय-३२) या तरुणास अज्ञात आराेपीने फाेनवर संर्पक करुन ऑनलाईन काम करुन जास्त नफा मिळवून देताे असे अमिष दाखवले. त्याकरिता वेळाेवेळी खाेटी कारणे सांगून त्याचेकडून अडीच लाख रुपये घेऊन फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत काेंढवा पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे काेंढवातील डाॅ.सतीशचंद्रक वासुदेव जाेशी (वय-६८) यांना अज्ञात व्यक्तीने माेबाईलवर एक लिंक पाठवली. ती ओपन केली असता आराेपीने डाॅक्टरांचे एसबीआय खात्यावरुन २२ हजार रुपये डेबीट करत गंडा घातला आहे.