आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारी रोजी नुक्कड साहित्य संमेलन तर 8 जानेवारी रोजी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नुक्कड साहित्य संमेलनात साहित्यकेंद्रीत कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे तर मुलांना केंद्रस्थानी ठेवून तसेच मुलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर, बालसाहित्यकार राजीव तांबे आणि प्रा. डॉ. आनंद काटीकर यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.
नुक्कड आणि बालसाहित्य संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कुंटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भारत सासणे यांचे उद्घाटन सत्रात बीजभाषण होणार आहे.
जी.एं.च कथालेखन या विषयावर डॉ. संजीव कुलकर्णी तर जी.एं.च पत्रलेखन या विषयावर महेश आफळे बोलणार आहेत. सकाळी 11:15 वाजता ‘नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून डॉ. निर्मोही फडके या कथालेखन तर डॉ. रुपाली शिंदे या कादंबरी विषयांवर बोलणार आहेत. ‘कथा शांतारामांच्या, विषय वैविध्याचा' या सत्रात डॉ. राजेंद्र नाईकवाडे कथालेखन तर डॉ. सुजाता शेणई ललित बंध आणि समीक्षा या विषयावर मतप्रदर्शन करणार आहेत. दोन्ही सत्रांच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा गुंडी असणार आहेत.
दुपारी 12:10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड कथा अभिवाचन
दुपारी 1:30 ते 3:10 या वेळात ‘कविता, सादरीकरण आणि बरंच काही' हे सत्र
नवोदित कवींचे सादरीकरण
3:20 ते सायंकाळी 5 या वेळात ‘माज्या जल्माची चित्तरकथा' हा दीर्घांक
युवा लेखक प्रणव सखदेव यांची मुलाखत
रविवारी बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार असून प्रसिद्ध चित्रकार रवींद्र देव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 10:50 वाजता ‘ऐकताय ना माझी कविता' हे मुलांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी आश्लेषा महाजन असणार आहेत. सकाळी 11:15 वाजता रंगभाषातर्फे ‘बखर बिम्मची' हे नाट्यसादरीकरण होणार आहे. याशिवाय मुलांसाठी अनेक उपक्रम होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.