आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिटा, मोक्का गुन्हात प्रथमच महिला आरोपीला शिक्षा:कुख्यात कल्याणी देशपांडेसह साथीदाराला सात वर्ष सक्तमजुरी, साडेदहा लाखांचा दंड

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणार्‍या कुख्यात कल्याणी देशपांडेसह आणखी एकाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागले असे आदेशात नमूद केले आहे.

कल्याणी देशपांडे आणि प्रदिप गवळी अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपी कल्याणी देशपांडे हिला पिटा आणि मोक्का गुन्हात झालेली ही शिक्षा प्रथमच राज्यातील महिला आरोपीस अशाप्रकारे झालेली शिक्षा आहे.

पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी कल्याणी देशपांडे हिच्यावर चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. फरगडे यांनी युक्तीवादा दरम्यान केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली आहे.

राज्यातील पहिलीच शिक्षा केस

राज्यात प्रथमच बेकायदेशीर वेश्याव्यवसाय प्रकरणी कुख्यात कल्याणी देशपांडे आणि तिचा साथीदार प्रदीप रामहरी गवळी यांचेवर पाेलीसांनी ऑक्टाेबर 2016 मध्ये माेक्कानुसार कारवाई केली होती. कल्याणी देशपांडे ही 1998 पासून वेश्याव्यवसाय रॅकेट मध्ये सक्रिय असून 25पेक्षा अधिक गुन्हे तिच्यावर विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956चे कलम 3,4,5,7 सह भारतीय दंड विधान संहिता कलम 370, 370 (अ),34 अन्वये दाखल गुन्ह्यात ती दोषी आढळली आहे. तसेच आराेपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन 1999चे कलम 3 (1), 3(2), (3), (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने ती त्यात दोषी ठरल्याने शिक्षेस पात्र झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...