आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र:सांगलीमध्ये लॉकडाऊन नियम मोडणाऱ्यांकडून करुन घेतला जातोय नागिण डान्स आणि रस्त्यांची स्वच्छता

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 4 लाखांच्या जवळपास आहे. असे असूनही, लॉकडाऊनचे नियम मोडत लोक सतत घराबाहेर फिरत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्याचा एक अनोखा मार्ग सांगली पोलिसांना सापडला आहे. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांना पकडून पोलिस मध्य रस्त्यावर नागिण डान्स, परिसराची साफसफाई आणि पुश-अप्स करुन घेत आहेत. एवढेच नाही तर त्यांना दंडेही मारत आहे.

नियम लागू करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स
अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी सांगली पोलिसांनी आर्मीमधून रिटायर्ड 20 एक्स सर्व्हिसमन यांची एक टास्क फोर्स तयार केली आहे. हे लोग शहरातील विविध भागांमध्ये फिरुन सोशल डिस्टेंसिंग पालन न करणाऱ्यांना धडा शिकवतात. सांगलीमध्ये एकूण 1762 रुग्ण आहेत, तर एकूण 57 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एका दिवसात 200 पेक्षा जास्त लोकांना पकडले
या लोकांवर मास्क न लावणाऱ्यांना टोकणे आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या लोकांना पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी या टास्ट फोर्सने संपूर्ण दिवसात 200 पेक्षा जास्त लोकांना नियम तोडताना पकडले आणि त्यांना शिक्षा दिली.

सांगितली दिली जातेय हटके शिक्षा
सांगलीमध्ये नियम तोडणाऱ्याना हटके पद्धतींनी शिक्षा दिली जात आहे. कुणाला नागिण डान्स करायला सांगितला जातोय. तर कुणाला पुशअप्स काढायला सांगितले जात आहे. तर काहींना जमिनीवर लोटांगण घालण्याची शिक्षा दिली जातेय. तर कुणाला योग करणे किंवा झाडू मारण्याची शिक्षा दिली जात आहे.