आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसेवाला हत्या:पंजाब, दिल्ली पोलिसांची पुण्यामध्ये चौकशी, महाकालचा साथीदार संतोष जाधव पत्नी, मुलांसह फरार

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला प्रकरणात गुरुवारी दिल्ली आणि पंजाबच्या पोलिसांनी पुण्यात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली. गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिसांचे एक पथक गुरुवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी आरोपी सौरभ महाकाल याचा काही संबंध आहे का, त्याची या गुन्ह्यात नेमकी कोणती भूमिका आहे, त्याचा साथीदार संतोष जाधव कुठे फरार झाला आहे, त्याचा काही ठावठिकाणा माहिती आहे का, याबाबत त्यांनी माहिती घेतली आहे.

पंजाब पोलिसांच्या पथकाने मुसेवाला प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव, सौरभ महाकाल हे राहत आसलेल्या मंचर, नारायणगाव परिसरातील विविध ठिकाणची प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी आरोपीला सौरभ महाकाल यास मंचर आणि संगमनेर येथे अधिक तपासासाठी नेले. संशयित आरोपी संतोष जाधव हा पत्नी आणि मुलासह पसार असून त्याच्या शोधासाठी एक विशेष तपास पथक कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

सलमानप्रकरणी मुंबई पोलिस पुण्या
अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र प्राप्त झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याच्या संशयाच्या कारणावरून सौरभ महाकाल या आरोपीकडे चौकशी सुरू केली आहे. सलमान खान याला प्राप्त झालेल्या धमकी पत्राबाबत महाकाल याला काही माहिती आहे का, त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का, बिश्नोई टोळीशी तो कशा प्रकारे संपर्कात आला, याबाबत चौकशी करून माहिती घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...