आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनी ट्रॅप:उद्योजकाला मागितले 61 लाख, पत्नीसोबत प्रेमसंबंधांचा केला बनाव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील घटना, वीस लाखांची खंडणी उकळून मागत होता 61 लाख

पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप करून बदनामी करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आणखी ६१ लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत खंडणीखोराला बेड्या ठोकण्यात आल्या. हनी ट्रॅपचा हा मोठा प्रकार खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून उघडकीस आणला आहे.

अविनाश वसंत जाधव (२८, दत्तनगर, कात्रज, पुणे) असे खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. फिर्यादींची इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याची कंपनी आहे. त्याच कार्यालयात आरोपी आणि आरोपीची पत्नी लग्नापूर्वी कामाला होते. जाधव याची पत्नी तेथे सुपरवायझर म्हणून नोकरीस होती. तेथेच जाधवचे आणि तरुणीचे प्रेमसंबंध जुळले होते. २०१७ मध्ये फिर्यादीने त्यांच्या लग्नासाठी ४० हजार रुपयांची मदत केली होती. परंतु, जाधवच्या पत्नीने कालांतराने काम सोडले. त्यानंतर त्याच्या पत्नीने फिर्यादींना फोन करून अविनाश हा कारागृहामध्ये असल्याचे सांगून २ लाख रुपयांची मदत मागितली होती. त्यामुळे फिर्यादींनी तिला एक लाख रुपयांची मदत केली.

२०१८ मध्ये जाधव हा कारागृहातून बाहेर आला. काही दिवसांतच त्याने फिर्यादींना फोन करून “तुमचे माझ्या पत्नीशी प्रेमसंबंध आहेत, तुम्ही रोज गाडीने फिरता, असे म्हणत तुमच्या प्रेमसंबंधाबाबत तुमच्या पत्नीला माहिती देताे,’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी फिर्यादीकडून याच कारणास्तव २० लाखांची खंडणी उकळली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser