आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करुणा शर्मांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा:पतीला घटस्फोट दे म्हणत महिलेला धमकावले; जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीला घटस्फोट देण्यासाठी विवाहित महिलेवर दबाव टाकल्या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात आज ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका 23 वर्षीय तरूणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिने तिच्या पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून करूणा शर्मा ( वय 43, रा. सांताक्रुज, मुंबई) यांनाही याच प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

तक्रारदार तरुणी येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहते. तरुणीच्या पतीला घटस्फोट हवा असल्याने तो करूणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत होता व तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

करुणा शर्माने हाॅकीस्टीकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...