आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक सरस गीते 'व्हॉईस ऑफ ए आर रेहमान' या नावाने सर्वपरिचित असलेल्या मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुरेल आवाजात रविवारी पुणेकर रसिकांनी अनुभविली. याबरोबरच विशाल भारद्वाज यांच्या ‘म्युझिक अँड मोर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली, निमित्त होते 16 व्या वसंतोत्सवचे.
संगीत चौकटीत नको - राहुल देशपांडे
राहुल देशपांडे म्हणाले, “गाणं म्हणजे रंगाचा डबा आहे, असे माझे आजोबा पं वसंतराव देशपांडे म्हणायचे. एक शास्त्रीय गायक म्हणून माझ्याकडे किती रंग आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. याच रंगांनी माझ गाणं आणखी समर्पक होतयं असे मी मानतो. एका चौकटीमध्ये संगीताला न पाहता त्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन लॉकडाऊनच्या काळात बदलला. आपण देवाची आराधना करतो तेव्हा सूर पहात नाही. ती हाक मनापासून येणारी असते संगीत असचं आहे, असायला हवं आणि म्हणूनच ते प्रगल्भ होत जाते.
मधुश्रींनी सादर केली बहारदार गीतं
रंग दे बसंती या लोकप्रिय चित्रपटात मधुश्री यांनी गायलेले ' तू बिन बताए...' या गीताने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर जोधा अकबर चित्रपटामधील 'इन लम्हों के दामन में पाकीज़ा से रिश्ते हैं...' , शीशा चित्रपटातील राग कलावती मधील 'यार को मैंने...', कभी खुशी कभी गम चित्रपटातील ' माही वे...' ही गीते सादर केली.
त्या गाण्यासाठी सलग 13 दिवस रेकाॅर्डींग
यांनतर त्यांनी युवा या चित्रपटातील ' कभी नीम नीम...' हे गीत प्रस्तुत केले. या गीताच्या रेकॉर्डिंग ची आठवण सांगताना त्या म्हणाले, "या गाण्यासाठी आम्ही सलग 13 दिवस रेकॉर्डिंग करत होतो. अखेर ए आर रेहमान यांच्या मनासारखे रेकॉर्डिंग झाले. पुढे या गाण्याचे मी तमिळ व तेलगू भाषेत रेकॉर्डिंग केले. तेही खूप गाजले."
'ये रे घना, ये रे घना... ' हे मराठी गीत तर बाहुबली २ मधील ' कान्हा सो जा जरा...' हे भजन, ' तुम जो मिल गए हो तो ये लगता है' , ' लग जा गले...' 'छाप तिलक...' या गीताने त्यांनी समारोप केला.
विशाल भारद्वाज यांचे सादरीकरण
यानंतर विशाल भारद्वाज यांचा ‘म्युझिक अँड मोर’ हा कार्यक्रम सादर झाला. त्यांनी या आधी सादर न केलेल्या ‘ये जमाना क्यों है...’, ‘मास्क के पीछे...’ या अप्रकाशित रचना प्रस्तुत केल्या. ‘दिल तो बच्चा है जी’, ‘पहली-पहली बार मोहब्बत कि है...’ या रचना दाद मिळवून गेल्या.
कार्यक्रमावेळी विशाल भारद्वाज यांनी राहुल देशपांडे यांना बोलावले. या दोघांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‘पानी पानी रे...’ या गीताला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्नेहल दामले यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.